Monday, July 8, 2024
Homeदेश१०० पैकी ४० रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात भारतीय, ड्रिंक्स ते पॅकेज्ड फूडला...

१०० पैकी ४० रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात भारतीय, ड्रिंक्स ते पॅकेज्ड फूडला अधिक पसंती

मुंबई: भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील बराचसा भाग आपल्या खाण्यापिण्यावर खर्च करतात. गेल्या काही वर्षात भारतीयांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. खास बाब म्हणजे हे बदल शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कुटुंबांची आपल्या घरगुती खर्चासाठीचा ताजा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टवरून समजते की आजही भारतीय कुटुंबे आपल्या कमाईतील सर्वाधिक भाग खाण्यापिण्यावर खर्च करतात.

१०० पैकी ३९.७० रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात भारतीय

NSSOने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात राहणारे भारतीय कुटुंब १०० पैकी ३९.७ रूपये केवळ खाण्यापिण्यावर खर्च करतात. तर ग्रामीण भागातील कुटुंब १०० पैकी ४७ रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात. या सर्वेक्षणात हे ही आढळले की गेल्या काही वर्षात भारतीयांनी धान्यावर होणारा खर्च कमी केला तर दूध आणि पॅकेज्ड फूडवर अधिक खर्च करत आहेत.

या सर्वेक्षणात हे ही आढळले की भले भारतीय आपल्या कमाईतील एक मोठा भाग खाण्या-पिण्यावर खर्च करत आहेत. मात्र या खर्चामध्ये गेल्या २० वर्षात घट झाली आहे.

दूध आणि पॅकेज्ड फूडवर अधिक खर्च

दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चात ४.२ टक्के वाढ झाली आहे. तर धान्यावर होणाऱ्या खर्चामध्ये ७.९ टक्के घसरण झाली आहे.

एंटरटेनमेंट आणि कपड्यांची जोरदार खरेदी

NSSOच्या माहितीनुसार भारतीय एंटरटेनमेंटवर आपल्या कमाईतील ६.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर कपड्यांवर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.४ टक्के भाग खर्च करत आहे. मेडिकल खर्चावर कमाईतील ५.९ टक्के भाग खर्च होत आहे. तर वाहनावर भारतीय कुटुंब ८.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर अभ्यासावर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.७ टक्के भाग खर्च करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -