
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा पाया अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी १३७ धावांची भागीदारी करत रचला. अभिषेकने ४६ बॉलमध्ये १०० धावा, दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने ४७ बॉलमध्ये ७७ धावा केल्या.
या शानदार खेळींच्या जोरावर भारताने पहिल्यांदा खेळताना २३४ धावांचा डोंगर उभा केला होता. दरम्यान, यजमान झिम्बाब्वे आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीला अडखळला. मात्र त्यातून हा संघ सावरला नाही. झिम्बाब्वेला १८.४ षटकांत केवळ १३४ धावा करता आल्या.
झिम्बाब्वेकडून वेसली मेधेवेने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर ब्रायन बेनेट्टने २६ धावा केल्या. तर ल्यूक जाँगवेने ३३ धावा केल्या. भारताकडून मुकेश कुमारने ३ गडी बाद केले. तर आवेश खानने ३ गडी बाद केले. रवी बिश्नोईने २ गडी बाद केले.