मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने १८ सामन्यांत १७ विकेट घेत टीम इंडियाला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
त्याने अखेरच्या सामन्यातील ४ षटकांत २० धावा देत दोन विकेट मिळवल्या होत्या. स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर जेव्हा तो आपल्या शहरात मोहालीमध्ये पोहोचला तेव्हा फुलांच्या हारांनी त्याचे स्वागत करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अर्शदीप सिह शनिवारी संध्याकाळी शहीद भगत सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. येथे त्याच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती.
#WATCH | Cricket fans welcome Arshdeep Singh on his return to Mohali after winning the T20I Cricket World Cup pic.twitter.com/d5ukPieNGM
— ANI (@ANI) July 6, 2024
एअरपोर्टवर अर्शदीपचे आई-वडील, त्याचे कोच, पंजाब सरकारमधील काही अधिकारी आणि मोठ्या संख्येने चाहते जमले होते. चाहत्यांनी यावेळी त्याच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. अनेकजण तर ढोलवर नाचत होते.
भारताच्या ऐतिहासिक विजयावर अर्शदीप म्हणाला, इतक्या उत्साहाने झालेले स्वागत पाहून खूप खुश झालो आहे. मुंबई अथवा चंदीगढ असो प्रत्येक ठिकाणी चाहत्यांनी दाखवलेला सपोर्ट अविश्वसनीय आहे. वर्ल्डकप जिंकणे हे स्वप्नासारखे आहे. तसेच चारही बाजूंनी प्रेम मिळणे हा जबरदस्त अनुभव आहे.






