नवी दिल्ली: राज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल आलले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला १० पैकी ८ जागांवर तर समाजवादी पक्षाला २ जागांवर विजय मिळाला आहे. बाकी दोन राज्यांपैकी कर्नाटकात काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले. तर हिमाचल प्रदेशात सत्तारूढ काँग्रेसला मोठा हादरा बदला. हिमाचल प्रदेशातील एका जागेवर भाजपने कब्जा मिळवला.
हिमाचल प्रदेशातील १ राज्यसभेच्या जागेवरील सामना चांगलाच रंगतदार ठरला. येथे एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस आणि भाजप यांच्यात रंगतदार सामना होता. काँग्रेसकडे संख्याबळ होते. त्यामुळे असे मानले जात होते की काँग्रेससाठी ही लढाई सोपी आहे. मात्र काँग्रेसच्या अभिषेक मुन सिंघवी तेथून हरले.
काँग्रेस नेता आणि भाजपचे हर्ष महाजन यांना निवडणुकीत ३४-३४ मते पडली होती. त्यानंतर लॉटरी सिस्टीमच्या माध्यमातून चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यानंतर बाजी पलटली. चिठ्ठीमध्ये हर्ष महाजन यांचे नाव निघाले होते. तर या निवडणुकीत काँग्रेसच्या ६ खासदारांनी क्रॉस वोटिंग केले होते.
कर्नाटकात काँग्रेसने राखली लाज, भाजपलाही एका जागेवर विजय
दुसरीकडे कर्नाटकच्या चार जागांपैकी काँग्रेसचे तीन उमेदवार अजय माकन, नासिर हुसैन आणि जीसी चंद्रशेखर यांनी विजय मिळवला. राज्यातील एका जागेवर भारतीय जनता पार्टीचे नारायण बंदिगे यांनी विजय मिळवला.
समाजवादी पक्षाच्या दोन उमेदवारांना मिळाली सर्वाधिक मते
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांवर रात्री उशिरा झालेल्या निकालात भाजपने ८ तर समाजवादी पक्षाने २ जागांवर विजय मिळवला. यात सर्वाधिक मते समाजवादी पक्षाच्या उमेदवार जया बच्चन यांना ४१ मते मिळाली. तर दुसरे उमेदवार रामजी लाल सुमन यांना ४० मते मिळाली.