Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडा१००० कोटीहून अधिक नेटवर्थ...क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भले धोनी निवृत्त झाला असला तरी आजही तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये चौकार-षटकार ठोकताना दिसत आहे.

क्रिकेटच्या पिचवर नव्हे तर बिझनेसमध्येही महेंद्रसिंग धोनीचा जलवा आहे. तो अनेक पद्धतीने कमाई करत आहे. रिपोर्ट्सनुसार एमएस धोनीची नेटवर्थ १०४० कोटी रूपये आहे.

क्रिकेटशिवाय ब्राँड एंडोर्समेमट आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रिटर्नमधून त्याची जोरदार कमाई होत. रिपोर्ट्नुसार दर महिन्याला तो ४ कोटी रूपये कमावत असेल.

आयपीएल संघ सीएसकेचा कर्णधार म्हणून त्याला १२ कोटी रूपये मिळत होते. दरम्यान, गेल्या हंगामापासून त्याने कर्णधारपद सोडले होते.

धोनी तब्बल ३० प्रसिद्ध ब्राँड्स एंडोर्समेंट करतात. यात मास्टरकार्ड, जिओ सिनेमा, फायर बोल्ट, ओरिओ आणि गल्फ ऑईल अशी नावे सामील आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -