मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले. लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या टीम इंडियाला तसेच वर्ल्डकपविजेत्या संघाला भेटण्यासाठी आले होते.
या वर्ल्डकप विजेत्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी झालेल्या कौतुकाने सारेच क्रिकेटर भारावून गेले.
#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men’s cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV
— ANI (@ANI) July 5, 2024
या भव्य दिव्य स्वागतानंतर आज विधानभवनात भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जायसवाल यांनी वर्ल्डकप विजेत्या संघात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या दरम्यान रोहित शर्माने विधानभवनात मराठी भाषेत जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्माने सर्व चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने मजेशीर बाबही सांगितली. तो म्हणाला की सूर्याने सांगितले की सामन्यादरम्यान त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला नाहीतर मी त्याला बसवला असता. या शब्दात त्याने फटकेबाजी केली.