मुंबई:एअरटेल(airtel) टेलिकॉम कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान बाजारात आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार हे रिचार्ज प्लान आखलेले असतात. काही ग्राहकांना डेटाची अधिक गरज असते तर काहींना लिमिटेड डेटासोबत कॉलिंगची सोय हवी असते.
ग्राहकांच्या या विविध गरजा लक्षात घेता त्यानुसार वेगवेगळे रिचार्ज प्लान कंपनी बाजारात आणत असते. त्यामुळे मोबाईल धारकांनाही आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडता येतो.
एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी १९९ रूपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी ग्राहकांना दिली जाते.
डेटा लिमिट संपल्यानंतर ५०P/MBच्या दरानेही चार्ज केले जाते. संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३ जीबी डेटा दिला जातो.
जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल तर तुम्ही वाऊचर खरेदी करू शकता. अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यामध्ये मिळतात.
या प्रीपेड प्लानसोबत ५ रूपयांचा टॉकटाईमही दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही मिळतात.