पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक पसार झाला आहे. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याचा जागीच मृत्यू झाला. समाधान कोळी असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव असून संजोग शिंदे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॅरीश पुलाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने भीषण धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक धडक देऊन पसार झाला आहे.