वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे तरूण बेरोगार होत आहेत. त्याचा परिणाम भारतीयांवर झाला आहे. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नोकऱ्या धोक्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. भारतीयांना नोकरी शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
तसेच अमेरिकेतील अग्रगण्य गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ले-ऑफ देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसह युरोपमध्येदेखील हे चित्र पाहायला मिळत आहे. नोकरी संपुष्टात आल्यामुळे त्यांना कामानिमित्त संबंधित देशाने राहण्यासाठी दिलेला परवाना (वर्क व्हिसा) टिकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
प्रामुख्याने अमेरिकेत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), आयटी क्षेत्र, ग्राहक सेवा आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन वेगाने वाढत आहे. प्रामुख्याने एआयचा विकास दर ६२ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.अमेरिकेत सुमारे ६ लाख भारतीय व्यावसायिक एच १ वी व्हिसाधारक आहेत. एआयमुळे नोकऱ्या गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठ्या कंपन्या वेगाने एआय मॉडल्सचा अवलंब करत आहेत.
मॅकेन्झी ग्लोबलच्या अहवालानुसार, अमेरिकेतील ऑटोमेशनमुळे, २०३० पर्यंत सुमारे १ कोटी २० लाख लोक एकतर त्यांच्या नोकऱ्या गमावाव्या लागण्याची शक्यता आहे. व्हॅलीमध्येही तीन वर्षांत स्टार्टअपमधील नोकऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा सरासरी विकास दरही ७ वर्षाच्या नीचांकी पातळीवर जाईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. या परिस्थितीला रशिया युक्रेन युद्ध हे देखील मोठे कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेत सुमारे तीन लाखांवर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच अमेरिकेत सध्या जे ६ लाखांवर परदेशी कर्मचारी व्यावसायिक व्हिसावर कार्यरत आहेत, त्यात भारतीयांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. यातही सॉफ्टवेअर इंजिनिअर जास्त आहेत. अमेरिकेतील एकूण सॉफ्टवेअर इंजिनिअर्समध्ये भारतीयांचे प्रमाण ५ टक्के आहे.
अमेरिकेत बेरोजगारीचा दर गेल्या अडीच वर्षांतील उच्चांकी म्हणजे ४.१ टक्क्यांवर पोहोचला. नोकऱ्यांच्या क्षेत्रात अल्पशी मंदी त्यातून सूचित होते. अहवालानुसार अर्थव्यवस्थेने एप्रिल आणि मे मध्ये पूर्वीच्या अंदाजापेक्षा १,११,००० कमी नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेने जूनमध्ये २०६००० नोकऱ्या निर्माण केल्या. मेमध्ये ही संख्या २,१५००० होती. बेरोजगारीचा दर ०.१ टक्क्यांनी वाढून ४.१ टक्केवर गेला. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच बेरोजगारीचा दर ४ टक्क्यांच्या वर आहे.