मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब आहे मात्र जास्त केस गळायला लागल्यास ही चिंतेची बाब बनते. केस गळती रोखण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात. मात्र केसांना खरंतर आतून पोषण हवे असते. जे खाण्यातून मिळते.
पोषकतत्वांच्या कमतरतेमुळेही केस गळती होते. जर तुम्ही योग्य आणि पौष्टिक आहाराचे सेवन करत असाल तर तुम्हाला केसगळतीपासून मुक्तता मिळते. सोबतच तुमचे केसही सुंदर होतील. येथे आम्ही तुम्हाला ३ पदार्थ सांगत आहोत जे हेअरफॉल रोखण्यास मदत करू शकते.
फळांचे सेवन
शरीरासोबत फळे ही केसांच्या आरोग्यासाठी चांगली असतात. सर्व प्रकारच्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे त्वचा आणि केस निरोगी राखण्यात मदत करतात. केसांची गळती रोखण्यासाठी व्हिटामिन सी, ईने भरपूर असलेले बेरी, चेरी, संत्री, द्राक्षे यांचे सेवन केले पाहिजे. या फळांच्या सेवनाने तुमच्या स्काल्पची फ्री रेडिकल्सपासून सुरक्षा होऊ शकते.
ड्रायफ्रुट्स आणि सीड्स
ड्रायफ्रुट्स आणि सीड्समध्ये असे पोषकतत्वे असतात जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात प्रोटीन, झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, सेलेनियम आणि व्हिटामिन ई असते जे केस मजबूत ठेवण्यात आणि त्यांची गळती रोखण्यास मदत करते. अक्रोड, बदाम, फ्लॅक्ससीड, चिया सीड्सचा आपल्या आहारात जरूर समावेश करा.
हिरव्या भाज्या
फळांप्रमाणेच हिरव्या रंगाच्या पालेभाज्या पोषकतत्वांनी भरलेली असते. यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते. कोबी, पालक, कोलार्ड्स सारख्या भाज्यांमध्ये व्हिटामिन ए, आर्यन, बीटा कॅरोटिन, फोलेट आणि व्हिटामिन सी असते.