Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची (Mumbai Railway stations) नावे बदलण्याचा निर्णय चर्चेत आहे. या निर्णयासंबंधी आज विधानपरिषदेत चर्चा होणार आहे. मुंबईच्या पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावरील (Western, Central and Harbour railway) काही ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलून त्यांना त्या परिसराला ओळखल्या जाणाऱ्या मराठी नावात बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंबंधी ज्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत, त्यांची यादी समोर आली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली जाणार आहेत. आज विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी नवनिर्वाचित शिक्षक आणि पदवीधरमधून निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकीय ठरावही आज विधान परिषदेत ठेवला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
करीरोड : लालबाग रेल्वे स्थानक
सॅन्डहर्स्ट रोड : डोंगरी रेल्वे स्थानक

पश्चिम मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
मरीन लाईन रेल्वे स्थानक : मुंबादेवी रेल्वे स्थानक
चर्नीरोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक

हार्बर मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
कॉटनग्रीन : काळाचौकी रेल्वे स्थानक
डॉकयार्ड : माझगांव रेल्वे स्थानक
किंग्ज सर्कल : तीर्थंकर पार्श्वनाथ स्थानक

त्यामुळे आजच्या विधानपरिषदेत स्थानकांच्या नावांबाबत नेमकं काय ठरवलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -