Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीखून, बलात्कार, लूटमार, दरोडे.. तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक!

खून, बलात्कार, लूटमार, दरोडे.. तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक!

मुस्लिमांच्या डोळ्यांत अंजन घालणारे खासदार बदरुद्दीन अजमल यांचे स्फोटक वक्तव्य

नवी दिल्ली : खून, बलात्कार, लूटमार, दरोडा अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत आणि तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो, असे मुस्लिमांच्या डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक वक्तव्य केल्याने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख खासदार बदरुद्दीन अजमल (MP Badruddin Ajmal) वादग्रस्त ठरले आहेत.

बदरुद्दीन अजमल यांनी २० ऑक्टोबर रोजी आसामच्या गोलापारा जिल्ह्यात एका महाविद्यालयाच्या सभेला संबोधित करत असताना मुस्लिम समुदाय कसा अशिक्षित असतो? शिक्षण घेण्यात मागे पडल्याने कसा गुन्हेगारीकडे वळतो? हे सांगितले. तसेच या सगळ्याचा संबंध गुन्हेगारीशीही त्यांनी जोडला.

ते यावेळी म्हणाले की, “आपल्या (मुस्लिम समुदाय) मुलांकडे शाळेत किंवा महाविद्यालयात जायला वेळ नसतो. मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो. जरा स्वतःच्या मनाला विचारा की हे काय करत आहात. सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत आणि ही अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे.” असे त्यांनी म्हटले होते.

एवढेच नाही तर पुढे ते म्हणाले की, “लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यावर यान धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा जरा पोलीस स्टेशनला जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजउद्दीन अशीच नावे तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का?” अजमल यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले आहे.

“मी जगभरातल्या मुस्लिम समुदायाच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण घेण्याचे प्रमाण मुस्लिम समुदायात कमी आहे. आमची मुले शिकत नाहीत याचे मला वाईट वाटते. आमची मुले ही उच्च शिक्षणासाठी विदेशातही जात नाही नाही. मुस्लिम बांधवांना शिक्षणाचे महत्त्व समजावे म्हणून हे वक्तव्य केले होते.” असे स्पष्टीकरण बदरुद्दीन अजमल यांनी दिले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, “एकीकडे ही मुले म्हणतात की मुलींकडे पाहून त्यांचं रक्त उसळतं. मी त्यांना हे सांगू इच्छितो की इस्लाम सांगतो की तुम्ही जर घराच्या बाहेर पडलात तर तुमची नजर जमिनीकडे हवी. जर कुठल्याही मुलीकडे तुम्ही वाईट नजरेने पाहिलंत तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमच्या घरातही आया-बहिणी आहेत.” तुम्ही असा विचार केलात तर मुलींबाबत तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत असाही सल्ला अजमल यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -