Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीIndian Army : जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा! तर दोन जवान शहीद

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा! तर दोन जवान शहीद

अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण

अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल रात्री भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी (Indian soldiers) चार दहशतवाद्यांचा खात्मा केला तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील अकोला (Akola) जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाला २४ व्या वर्षी वीरमरण आले आहे. सैन्यातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली. त्यानंतर सायंकाळी फ्रिसल या गावी दुसरी चकमक झाली. पहिल्या चकमकीत भारतीय जवान गंभीर जखमी झाले. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. दोन्ही गावात दहशतवादी घरांमध्ये लपून बसले होते. तिथूनच ते गोळीबार करत होते. एका चकमकीत सुरक्षा दलाने संबंधित घराला स्फोटकांनी उडवून दिले. ज्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या घटनेत अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील २४ वर्षीय प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे.

अजूनही चकमक सुरु

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे चकमक झाली तेथील ड्रोन फुटेजनुसार चार मृतदेह आढळून आले. गोळीबार सुरु असल्याने ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले नव्हते. काश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही. के. बिर्डी यांनी सांगितले की, चारही दहशतवाद्यांचे मृतदेह आमच्या ताब्यात आहेत. मात्र इतर माहिती मोहीम संपल्यानंतर दिली जाईल. सध्यातरी ही चकमक चालू आहे. चकमक सुरु असून नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असंही त्यांनी म्हटलं.

अकोल्यातील जवान शहीद

दहशतवाद्यांशी लढताना अकोला जिल्ह्याच्या प्रवीण जंजाळ या २४ वर्षीय जवानाला वीरमरण आल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी मिळाल्यानंतर जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली. प्रवीण जंजाळ २०१९ साली सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले जाते. मागच्याच वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -