Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीदिग्गज दाक्षिणात्य संगीतकार राज यांचे निधन

दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार राज यांचे निधन

हैदराबाद : दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक राज यांनी वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगू चित्रपटात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे.

रविवारी २१ मे रोजी संध्याकाळी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या राहत्या घरीच ते बाथरूममध्ये अचानक कोसळले.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज संगीतकारांसोबत राज-कोटी यांनी म्युजिक कंपोज केले आहे. राज आणि कोटी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध संगीत जोडी आहे. ही जोडी दमदार संगीत देईल याची निर्मात्यांना खात्री असायची. अगदी ए. आर. रहमान यांच्याकडेही ते प्रोग्रामर म्हणून होते. जवळपास १८० हून अधिक चित्रपटांसाठी या जोडीने संगीत संयोजन केले आहे.

बालासुब्रमण्यम यांच्या कित्येक गाण्यांना त्यांनी संगीत दिले. १९९४ मध्ये आलेल्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, ज्या चित्रपटात नागार्जुन यांनी मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर काही वर्षांनी राज आणि कोटी वेगळे झाले आणि स्वतंत्र काम करू लागले.

राज यांचे खरे नाव थोटकुरा सोमराजू असे होते. पण त्यांना राज म्हणूनच सगळे ओळखायचे. त्यांचे वडील टीवी राजू हे प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार होते. राज यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -