Friday, June 20, 2025

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया


जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची सोनोग्राफी (sonography) करण्यास बंदी असली तरीही अनेक डॉक्टर पैशांच्या मोहासाठी अवैधरित्या कामे सुरु करतात. अशातच जालना (Jalna News) येथील भोकरदन शहरात सोनोग्राफी सेंटरवर अवैध गर्भपात (Abortion) केल्याच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. त्यामुळे आरोग्य पथकाने (Health Department) भोकरदनमध्ये सुरु असणाऱ्या बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकली. छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला मोठे घबाड सापडले असून डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या डॉ. राजपूत सोनोग्राफी सेंटरवर अवैध गर्भपाताचा गोरखधंदा सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने आरोग्य पथकाला मिळत होत्या. त्यामुळे आरोग्य पथकाने या सेंटरवर अवेळी छापा टाकल्यामुळे डॉक्टरचा गोरखधंदा समोर आला आहे. छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला दोन सोनोग्राफी मशीन, एक तिजोरी भरून गर्भपाताच्या गोळ्या आणि लाखो रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.


दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच डॉक्टरने हॉस्पिटलमधून पोबारा केला. मात्र त्याठिकाणी पथकाने ८ लाख ९१ हजार ७६० रोख रक्कम, सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारे औषधे जप्त केले आहेत. तसेच आरोग्य पथकाने पोलिसांच्या मदतीने या डॉक्टरवर कारवाई देखील केली आहे.

Comments
Add Comment