Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न

ध्वनिक्षेपण मर्यादेचे उल्लंघन करणा-या मंडळावर कारवाई

नाशिक : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी दिलेल्या शंभर टक्के योगदानामुळे यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत तसेच आनंदमय वातावरणात पार पडली.

शेवटच्या दिवशी परिमंडळ-१ हददीतील भद्रकाली सरकारवाडा पंचवटी या हददीतील मुख्य मिरवणुक मार्गावरील एकुण २१ मंडळांची व नाशिकरोड-उपनगर- देवळाली कॅम येथील मिरवणुक मार्गावरील ५ मंडळांची मिरवणुक अत्यंत शांततेत व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी नाशिक शहरातील नागरीक, महिला, मुले/मुली यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस उप आयुक्त ४, सहा. पोलीस आयुक्त ७, पोलीस निरीक्षक-५२, सपोनि /पोउनि व नवप्रविष्ठ अधिकारी १४९ पोलीस अंमलदार १३७४ होमगार्ड १०५०, स्ट्रायकिंग फोर्स ६ प्लाटुन, आर. सी.पी.-२ प्लाटुन, एस. आर. पी. एफ. १. कंपनी, जलद प्रतिसाद पथक-२ प्लाटुन असा बंदोबस्त तैनात होता.

सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतांना नियमांचे पालन करणेबाबत व अटी शर्तीचा भंग केला जाणार नाही याबाबत लेखी अंडरटेकिंग दिलेले असताना भद्रकाली ते पंचवटी या मार्गावरील रोकडोबा मित्र मंडळ अध्यक्ष अतुल मदन जाधव व डी. जे. वादक वैभव गायकवाड, शिवसेवा मित्रमंडळ, गामा पुतळा अध्यक्ष संदीप कानडे व डीने चालक चैतन्य गिरीष काळे, युवक मित्र मंडळ, मुंबईनाका अध्यक्ष किरण मोटकरी व डीजे चालक राहुल कुणाल जाधव, दंडे हनुमान मित्र मंडळ अध्यक्ष मंथन मोटकरी व डीजे चालक ऋषीकेश विजय इंगळे, युनायटेड फेंड सर्कल अध्यक्ष मयुर वजरे व डीजे चालक समाद बहुपंत आमले व नाशिकरोह येथील १ गणेश मंडळ साईराज फाउंडेशन मित्र मंडळ, जेलरोड अध्यक्ष निखील दिपक सपकाळे व डीजे चालक गणेश वसंत शिरसाठ यांनी डी. जे. वाजवुन ध्वनी मयदिचे उल्लंघन केल्याने भद्रकाली पोलीस स्टेशन कडुन ५ गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डी. जे. चालक यांचेवर व नाशिकरोड पोलीस स्टेशन येथील १ गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डी. जे. चालक अशा एकुण ६ मंडळावर ध्वनीमर्यादेचा व पोलिसांचे अटी शर्तीचा भंग केला म्हणुन कारवाई करून संबंधीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण,२००० चे नियमांचा भंग तसेच भा.द.वि. कलम १८८, २९१, १०२, ११४, ३४ सह मपोका, कलम१३५ सह ३३ (r) (३)/१३१ अन्वये संबंधीत सहा. पोलीस आयुक्त यांच्याकडे सी.आर.पी.सी. कलम २०० व २०४ प्रमाणे कार्यवाही होवुन मा. न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी अहवाल सादर केले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुक सुरू असताना भद्रकाली पोलीस ठाणे हददीत रात्री ०८.३० ते ०८.४५ वा. दरम्यान भाजी मार्केट जवळ आरोपी चेतन भांबारकर व त्याचे दोन मित्र यांनी धक्का लागला या कारणावरून कुरापत काढुन फिर्यादी हेमंत चंदु जाधव वय २५ याच्या डोक्यात फायटर सारख्या वस्तुने मारून दुःखापत केल्याने भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ सह मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उपनगर पोलीस स्टेशन हददीत गवळीवाडा, देवळालीगांव रोडवर दिनांक २८/०९/२०२३ चे ०८.०० ते ०८.३० वा. दरम्यान फिर्यादी आकाश दशरथ तपासे वय १७ वर्षे हा गणेश विसर्जन मिरवणुकीत असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद करून अनिकेत देवरे, अमोल देवरे, सार्थक आहिरे व आरमान शेख यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून गच्ची पकडुन मारहाण केली तसेच सार्थक आहिरे याने त्याचे हातातील धारधार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार केले म्हणुन उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं. ३६८ / २०२३ भाविक ३२६ ३२४, ३२३, ५०४, ३४ मपोका कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतुन निघालेल्या मुख्य मिरवणुकीत ढोल वाजवणा-या तरुण ढोल वादकास भोवळ आली असता तेथे उपस्थित पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचे आदेशाने त्यांचे स्ट्रायकिंग फोर्स मधील गुन्हेशाखा युनिट १ नेमणुकीस असलेले पोउनि, चेतन श्रीवंत व मुक्तार शेख यांनी ढोल वादकास खांद्यावर घेवुन अॅम्ब्युलन्स पर्यंत पोहचवून उपचारार्थ दाखल करण्याची कार्यवाही तातडीने केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -