परिसरात धुराचे लोट
डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात दोनवेळा कारखान्याला भीषण आग लागली होती. आता पुन्हा डोंबिवलीमधील सोनारपाडा एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
एमआयडीसी फेज-२ मधील एका कंपनीत हा स्फोट झाला. यानंतर तिथे भीषण आग लागली असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.