Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाVirat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. काल मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे विजयी भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उसळलेला जनसागर पाहता याची प्रचिती आली. या शोभायात्रेनंतर वानखेडे स्टेडिअमवरही (Wankhede Stadium) अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशननंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) तडक लंडनला रवाना झाला आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.

विराट कोहलीचा देशभरातच नव्हे तर अख्ख्या जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना प्रचंड रस आहे. पण विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम खाजगी ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांचे चेहरे देखील त्यांनी अद्याप मिडीयासमोर आणलेले नाहीत.

विराट कोहली नेहमीच आपल्या कामामधून जसा वेळ मिळेल तसं आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. यावेळीही विजयी सेलिब्रेशननंतर तो तडक लंडनला निघाला याचं कारण म्हणजे विराटची पत्नी अनुष्का आणि त्याची दोन मुलं वामिका आणि अकाय लंडनमध्ये आहेत. याआधी विराटने दिल्लीमध्ये त्याची बहिण आणि भावासोबतही चांगला वेळ घालवला होता. यानंतर तो आता पत्नी व मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला निघाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -