माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार असे राणेंनी दिले होते आश्वासन
कणकवली : मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाचे अर्धवट राहिलेले काम पूर्णतः नेण्या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात यावेळी निर्णय झाला.
नारायण राणे खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार खासदार राणे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे भेट घेऊन चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान नितीन गडकरी यांनी या प्रश्नावर जातीनिशी लक्ष घालून रत्नागिरीमधील अपूर्ण असलेले काम पूर्ण करु. तसेच चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमाणात राहिलेले कामसुद्धा पूर्णत्वास नेले जाईल, अशी ग्वाही दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास न्यावे यासाठी असणारा अडचणींवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक चर्चेतून महामार्ग चौपदरीकरणाचे काम यापुढे जलद गतीने सुरू होईल. नागरिकांचे प्रवाशांचे होणारे हाल संपतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.
विरोधक सत्ते पासून दूर असल्याने त्यांची मती भ्रष्ट झाली आहे असे दिसते.सेंगोल हे प्रतीक हटवून तेथे काय ठेवणार ते मात्र विरोधक सांगू शकत नाहीत.कारण विरोधक अक्कल नाम शिरोमणी आहेत.
अक्कल कमी वर्ग मागासलेला अशी विरोधकांची अवस्था झाले.