Tuesday, July 9, 2024
Homeमहत्वाची बातमी‘कर्तव्यपथा’वरील ‘प्रधानसेवक’!

‘कर्तव्यपथा’वरील ‘प्रधानसेवक’!

  • चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी

२० १४ साली मे महिन्यात इतिहास घडला. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आला. तो तळपणार, आपल्या तेजाने संपूर्ण देश प्रकाशमान करणार आणि त्याचा उजेड जगभर पडणार, हे विधिलिखित होते. झालेही तसेच.

पहिली पाच वर्षे आपली चमक दाखविल्यानंतर २०१९ साली या ताऱ्याने आपले राजकारणातील स्थान ‘ध्रुव’ ताऱ्यासारखे अढळ केले आणि सलग दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक स्वबळावर प्रचंड मताधिक्क्याने जिंकली.

आपल्या देशाचे लाडके नेते,पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदीजी यांनी देशात इतिहास घडविला. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि देशवासीयांचे भाग्य बदलायला सुरुवात झाली. मोदीजी यांच्या कार्यकाळाला मे २०२२ मध्येच आठ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षांमध्ये मोदीजी यांनी जे धडाकेबाज निर्णय घेतले, त्यामुळे आमुलाग्र बदल घडून आलेत. या बदलांचे सकारात्मक परिणाम आज अनुभवास येत आहेत.

मोदीजी यांनी देशाला परमवैभव मिळवून देण्याचा संकल्प सोडला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी ते अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्या संकल्पपूर्तीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने खारीचा वाटा जरी उचलला तरी पुढल्या काळात जनकल्याणाचा मोठा टप्पा गाठला जाणार आहे. या देशातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीची पंतप्रधानांची धडपड लक्षात घेतली, तर त्यांच्या अंतर्मनात काय चालले आहे आणि शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी ते काय करू इच्छित आहेत, याचा अंदाज आपल्याला निश्चितपणे येईल.

मोदीजी कायम अविश्रांत काम करीत आहेत. १८-१८ तास काम करण्यासोबतच नियमित योगसाधना करून त्यांनी स्वत:ची प्रकृतीही जपली आणि देशाची प्रकृती बिघडणार नाही, याचीही काळजी घेतली. पंतप्रधान मोदीजींसारखा नेता या देशाला लाभला, हे आपल्या सगळ्यांचे भाग्यच! मोदीजी देशवासीयांसाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहेत. अविश्रांत काम करताना त्यांनी कधीही स्वत:ची गाऱ्हाणी सांगितली नाहीत. पण देशवासीयांच्या तक्रारींवर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे निश्चितपणे सांगता येईल. देशाची अर्थव्यवस्था रुळावर यावी, सामान्य जनतेला दिलासा मिळावा, गरिबांचे जगणे सुकर व्हावे, शेतकऱ्यांना शेती करणे परवडावे, गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, महिलांना चूल आणि त्यातील धुरापासून मुक्ती मिळावी, जनमानस निरोगी राहावे, देश स्वच्छ-सुंदर व्हावा, प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यादृष्टीने विविध परिणामकारक योजना राबविताना पंतप्रधानांनी जी कल्पकता, तत्परता दाखवली, जे प्रामाणिक प्रयत्न केले, त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.

पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात देशात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. देशांतर्गत आघाडीपासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत जगभर नव्या भारताची झलक सर्वांना पाहायला मिळाली. जनकल्याणकारी अतिशय प्रभावी योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी १४० कोटी भारतीयांच्या हृदयापर्यंत धडक दिली आणि जनतेची मनं िंजकली, ही त्यांची सगळ्यात मोठी उपलब्धी मानली पाहिजे. मोदीजी यांनी देशहित डोळ्यांपुढे ठेवून काही कठोर निर्णयही घेतलेत. त्यामुळे अल्पकाळ सामान्य जनतेला त्रासही सहन करावा लागला. पण प्रसंगानुरूप घेतलेल्या कठोर निर्णयांची गोड फळे आता जनतेला चाखावयास मिळणार आहेत, हे निश्चित!

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’, हा मोदींचा कार्यमंत्र आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण झाले पाहिजे, यासाठी ते झपाटल्यागत काम करीत आहेत.विकासाचा एकमेव ध्यास घेतलेले पंतप्रधान मोदीजींच्या रूपाने आपल्याला लाभले, हे अहोभाग्यच! आपण ‘कर्तव्य पथा’वरील ‘प्रधानसेवक’ आहोत, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. म्हणूनच त्यांनी ८ सप्टेंबर रोजी ‘राजपथ’चे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ ठेवले आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घर मिळावे, हे मोदीजींचे स्वप्न आहे. त्यासाठीच त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना २०१५ मध्ये सुरू केली. शहरी व ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरे मिळावीत, हा त्यामागचा उद्देश! या योजनेंतर्गत सरकारने २०२२ पर्यंत देशातील ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे.

वैद्यकीय उपचारांअभावी कुणाचाही मृत्यू होऊ नये, प्रत्येकाला सुदृढ आयुष्य जगता यावे, यासाठी आयुष्मान भारत योजना मोदीजींनी सुरू केली. आयुष्मान भारत योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात, ही केवढी मोठी गोष्ट मानली पाहिजे, नाही का? या योजनेअंतर्गत देशातील १० कोटी कुटुंबातील ५० कोटी सदस्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर या योजनेच्या कक्षेत येणाऱ्या लोकांच्या गंभीर आजारांवर उपचार केवळ सरकारीच नाही, तर आता खासगी हॉस्पिटलमध्येही केले जातील, असे खुद्द पीएम मोदीजींनी जे म्हटले आहे, ते प्रशंसनीय आहे.

केंद्र सरकारची उज्ज्वला योजना ही ग्रामीण महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. या अंतर्गत सरकार गरीब कुटुंबांना घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोफत पुरवते. देशाच्या इतिहासात आजवर जे घडले नव्हते, ते एका योजनेमुळे सकारात्मकरीत्या घडत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला बँिंकग प्रणालीशी जोडण्यासाठी मोदींजींच्या कल्पकतेतून ‘जनधन योजना’ १५ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली. आज देशात ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ योजनेचे यश या योजनेमुळेच साध्य झाले आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत ४५ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. कोरोना संकटाच्या काळात या महिलांच्या बँक खात्यांवर मदतीचे पैसे पाठवण्यात आले. म्हणजेच या खात्याद्वारे सर्व प्रकारच्या अनुदानाचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे.

मोदींजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१९ पासून सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सुरू केली. याअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शेतकऱ्यांची काळजी घेण्यात मोदी सरकार कुठेही कमी पडले नाही.

ज्याप्रमाणे देशात कोणीही उपाशी झोपू नये, अशी पंतप्रधान मोदीजी यांच्या सरकारची इच्छा आहे, त्याचप्रमाणे २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे एक उद्दिष्ट आहे. ही योजना २०१९ मध्ये सुरू झाली. ही “हर घर नल” योजना जल जीवन मिशन म्हणूनही ओळखली जाते. या योजनेचे उद्दिष्ट प्रति व्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर या प्रमाणेे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे हे आहे. गेल्या २ वर्षांत या योजनेद्वारे ५.५ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे, ही फार मोठी उपलब्धी मानली पाहिजे.

पंतप्रधान मोदी जे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करतात, हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मोदी हे मोदी आहेत आणि त्यांच्यासम दुसरा कुणी नाही, हेच सत्य आहे. सत्तेत येताच पंतप्रधान मोदीजींनी सर्वप्रथम हाती घेतले ते ‘स्वच्छ भारत अभियान!’ या अभियानाचे जगभरातून कौतुक झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -