Friday, July 19, 2024
Homeक्रीडारोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. या धुरंधरने टीम इंडियाला गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे स्वप्न मोडले होते.

दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये मात्र रोहितने ही चूक केली नाही. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला मात देत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळवला. पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधाराने सोशल अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो सोमवारी बदलला. हा फोटो बदलल्यानंतर त्याच्या लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने सोमवारी आपल्या सोशल अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला. त्याने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा फोटो बदलला. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या अविस्मरणीय विजयानंतर बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा तिरंगा फडकावला होता. रोहित शर्माने तिरंगा जमिनीत रोवला आणि हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 

रोहितच्या प्रोफाईल फोटोला मिलियन लाईक्स

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोमवारी ८ जुलैला संध्याकाळी आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि पाहता पाहता लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली. केवळ ३ तासांच्या आत या फोटोला तब्बल १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -