Monday, June 24, 2024
Homeताज्या घडामोडीMHT-CET परीक्षेचा आज लागणार निकाल! जाणून घ्या निकाल कसा व कुठे पाहाल?

MHT-CET परीक्षेचा आज लागणार निकाल! जाणून घ्या निकाल कसा व कुठे पाहाल?

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Chamber) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या निकालाची (MHT-CET result) तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी ६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती व ही परीक्षा राज्यात २२ एप्रिल ते १६ मे यादरम्यान घेण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.

एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

जाणून घ्या निकाल कसा व कुठे पाहाल?

निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.

cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा.

त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा.

रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा.

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी सीईटी दोन सत्रात घेण्यात आली. २२ ते ३० एप्रिल २०२४ रोजी पीसीबी गटाची परीक्षा घेण्यात आली होती. पीसीएम गटाची परीक्षा २ मे ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे (Admission Process)

प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -