Saturday, July 5, 2025

पाऊस पुढील पाच दिवस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार, गुजरातमध्ये पुराची शक्यता

पाऊस पुढील पाच दिवस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार, गुजरातमध्ये पुराची शक्यता

नवी दिल्ली : पुढील ५ दिवस पाऊस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार असून देशाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.


राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि अरुणाचल प्रदेशातील घाट भागात पुढील ५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज २४ जून रोजी गुजरात राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवार २४ आणि मंगळवार २५ जूनला अंदमान आणि निकोबार बेट, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. तर २४ जून ते २६ जून दरम्यान दक्षिण किनारपट्टी अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे याठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.





पुढील २४ तासांत गुजरातमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून, बहुतांशी भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. सौराष्ट्राचा दक्षिण भाग, कच्छचा मध्य भाग, गुजरात राज्याच्या दक्षिणेकडील भागांत अतिवृष्टीमुळे कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा