अलिबाग : मुंबईतील बांद्रा येथील रिझवी कॉलेजच्या एनसीसी विभागातील चौघा विद्यार्थ्यांचा खालापूर हद्दीतील मोरबा डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रिझवी कॉलेजच्या एनसीसीमधील ३७ मुले/मुली खालापूर पोलिस ठाणे हद्दीत मोरबा डॅम साईबंधारा येथे कैंपसाठी आलेली आहेत. शुक्रवारी २१ जुन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पैकी एक मुलगा पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेली अन्य तीन मुलेही डॅमच्या पाण्यात बुडाली होती. रेस्क्यू टीमच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
बुडालेल्यांमध्ये एकलव्य सिंग (वय १८ वर्षे), ईशांत यादव (वय – १९ वर्षे), आकाश धर्मदास माने (वय २६ वर्षे), रणथ महादू बंदा (वय १८ वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.