मुंबई: इंग्लंडने यूएसएला ६२ चेंडू राखून १० विकेटनी सहज विजय मिळवला आहे. यूएसएचे गोलंदाज जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट यांची भागीदारी तोडू शकले नाहीत. कर्णधार जोस बटलरने ३८ बॉलमध्ये ८३ धावांची तडाखेबंद खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
यूएसएने पहिल्यांदा खेळताना ११५ धावा केल्या होत्या. यूएसएकडून निततीशे सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने २४ चेंडूत ३० धावांची खेळी केली होती. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये विकेट न गमावता ६० धावा केल्या होत्या. चांगल्या सुरूवातीनंतर इंग्लंडचा विजय औपचारिक राहिला होता.
यूएसएचे ११६ धावांचे आव्हान
यूएसएने टॉस हरल्याने त्यांना पहिल्यांदा फलंदाजीचे निमंत्रण मिळाले होते. संघाच्या ७ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. शेवटचे ४ फलंदाज तर आपले खातेही खोलू शकले नाहीत. यूएसएसाठी नितीश कुमारने ३० तर कोरी अँडरसनने २९ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमध्ये मोठी पार्टनरशिप होऊ शकली नाही. यामुळे यूएसएला केवळ ११५ धावाच करता आल्या. कर्णधार आरोन जोन्सने १० धावा तर हरमीत सिंहने २१ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडच्या सलामीच्या जोडीची कमाल
११६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या जोस बटलर आणि फिलिप सॉल्टने शानदार सुरूवात करून दिली. जोस बटलनेर ३८ बॉलमध्ये नाबाद ८३ धावा ठोकल्या. यात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार लगावले. तर फिलिप सॉल्टने २१ बॉलमध्ये २५ धावा ठोकल्या. ही जोडी फोडण्यात यूएसएच्या गोलंदाजांना यश आले नाही.