Thursday, March 20, 2025
Homeक्रीडाT20 World Cup 2024: इंग्लंडने सेमीफायनलमध्ये केला प्रवेश, बाकी संघाची काय स्थिती...घ्या...

T20 World Cup 2024: इंग्लंडने सेमीफायनलमध्ये केला प्रवेश, बाकी संघाची काय स्थिती…घ्या जाणून

मुंबई: २३ जूनला झालेल्या सामन्यात इंग्लंडने यूएसएला सहज हरवले. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडने १० विकेटनी सहज विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

आता ग्रुप २मध्ये इंग्लंडे ३ सामन्यांतील ४ पॉईंट्स झाले आहेत. तर या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर २ सामन्यात ४ पॉईंट्स आहेत. आज जर द. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचणारे दुसरे ठरतील. मात्र वेस्ट इंडिज जिंकल्यास त्यांच्या सेमीफायनलच्या आशा कायम राहतील.

भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीत कुठे?

या ग्रुपमधून अमेरिका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत तर इंग्लंडने सेमीफायनल गाठली आहे. आता या ग्रुपमधून दुसरा संघ दक्षिण आफ्रिका अथवा वेस्ट इंडिज ठरू शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ग्रुप १मध्ये सेमीफायनलच्या अतिशय जवळ आहे.

भारतीय संघाचे २ सामन्यात ४ गुण आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचे दोन दोन गुण आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया चांगल्या रनरेटमुळे दुसऱ्या स्थानावर आहे. या ग्रुपमध्ये बांगलादेशला मात्र विजय मिळवता आलेला नाही.

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने असणार आहे. दोन्ही संघांदरम्यानचा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता सेमीफायनल गाठणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -