यावर्षीही किमतीत होणार वाढ
नां. मुरूड : यंदा श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ७ सप्टेंबर रोजी येत असल्याने, प्रतिवर्षाच्या गणेशोत्सव सणाला पुरत्या नव्वद दिवसांचा अर्थात अद्याप तीन महिन्यांचा कालावधी असून मुरूड तालुक्यातील बहुतांशी गावातील गणेश मूर्तिकारांसह (sculptor) नांदगावमधील काही मूर्ती कारागिरांनी मूर्त्या (Ganesh Idols) बनविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
१० जून विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधून नांदगावमधील मूर्तिकार सतीश जोशी यांनी शाडूच्या मातीचे पूजन करून, मूर्त्या बनविण्यास प्रारंभ केला आहे. सद्या येथे मोसमी पावसाला सुरुवात झाली असली, तरी काही दिवसांतच त्याने ओढ दिल्याने, येथे कडक ऊन पडत आहे, त्याचा फायदा उठवित तयार मूर्त्या वाळविण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. नंतरच्या काळातील कामाची घिसडघाई टाळण्यासाठी लवकरच सुरुवात केल्यास पुढे त्याचा फायदा होतो. शिवाय सद्यस्थितीत कामगारही उपलब्ध होत नाहीत, झालेच तर मजुरीचे दरही परवडत नसल्याने कमी कामगारात जास्त दिवस काम करून मूर्त्या तयार करण्याचे काम करतो. त्यामुळे ताणही पडत नाही. असे मूर्तिकार जोशी यांनी सांगितले.
यावर्षी देखील शाडूच्या मातीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्त्यांच्या दरात वाढ तर होणारच आहे. शिवाय रंग साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. येथील बहुतांशी मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (POP) बनवलेल्या तयार मूर्त्या पेण तालुक्यातून आणतात. केवळ रंगकाम करून, त्यांची विक्री करतात.यावर्षी त्यांच्या कच्च्या मूर्त्यांच्या किमतीतही शंभर रुपयांपासून वाढ (Price Hike) झाली आहे. त्यामुळे किमतीत वाढ करणे गरजेचे झाले आहे. जोशी दरवर्षी दोनशे ते अडीचशे मूर्त्या तयार करतात.
कच्च्या मूर्त्यांच्या किमतीतही शंभर रुपयांपासून वाढ
गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. मुरुडमध्ये गणपतींच्या मुर्ती बनविण्याचे काम जोरदार चालू आहे. शाडूच्या मातीच्या दरात वाढ झाली. त्यामुळे मूर्त्यांच्या दरात वाढ तर होणार आहे. शिवाय रंग साहीत्याच्या दरात वाढ झाली. केवळ रंगकाम करुन त्यांची विक्री करतात. यावर्षी त्यांच्या कच्च्या मूर्त्यांच्या किमतीतही शंभर रुपयांपासून वाढ झाली आहे.