Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीAmazonवर सुरू झालाय मॉन्सून सेल, 5G फोन्सवर मिळतायत हजारोंचे डिस्काऊंट

Amazonवर सुरू झालाय मॉन्सून सेल, 5G फोन्सवर मिळतायत हजारोंचे डिस्काऊंट

मुंबई: नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान बनवत आहात तर अॅमेझॉनवर सेल सुरू झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर मान्सून मोबाईल मेनिया सेल सुरू झाला आहे. २० जूनपासून सुरू झालेला हा सेल २५ जूनपर्यंत असणार आहे. यात तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता.

सेलमध्ये १८ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय, १० हजारापर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि बँक डिस्काऊंट मिळत आहे. विविध बँकांच्या कार्डवर १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट आहे.

या फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट

OnePlus Nord 3 5G वर बंपर डिस्काऊंट आहे. हा फोन १९,९९९ रूपयांपेक्षा कमी किंमतीला मिळत आहे. हा ३३,९९९ रूपयांना लाँच झाला होता. तर OnePlus 11R 5G तुम्ही २७,९९९ रूपयांना खरेदी करू शकता. हा फोन ३९,९९९ रूपयांना लाँच झाला होता.

याशिवाय iQOO Z9x 5G तुम्ही ११,९९९ रूपयांना खरेदी करू शकता. Samsung Galaxy M34 5G सेलमध्ये १२,९९९ रूपये मिळत आहे. Redmi Note 13 5G तुम्ही १५,७४९ रूपयांना खरेदी करू शकता. तर Honor X9b 5G अॅमेझॉन सेलमध्ये २१,९९९ रूपयांना मिळत आहे.

करू शकता चांगली बचत

iPhone 13वरही चांगला डिस्काऊंट आहे. हा फोन तुम्ही ४८,७९९ रूपयांना खरेदी करू शकता. तर OnePlus Nord CE4 5G सेलमध्ये २२,९९९ रूपयांना उपलब्ध आहे. iQOO Z9 5G वरही डिस्काऊंट आहे हा तुम्ही १७,९९९ रूपयांना खरेदी करू शकता. Samsung Galaxy M14 5G सेलमध्ये ११,४९० रूपयांना मिळत आहे.

सोबतच तुम्ही Redmi 13C 5G ला सेलमध्ये ११,४९९ रूपयांना खरेदी करू शकता. यावर कोणतीही खास ऑफर नाही. जर तुम्ही कमी बजेटमध्ये स्मार्टफोनचा विचार करत आहात तर Lava O2चा विचार करू शकता. हा फोन ७,९९९ रूपयांना मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -