Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीKeyless Lock : कुलूप तर लावलं पण चावीच विसरलात? नो टेन्शन... आता...

Keyless Lock : कुलूप तर लावलं पण चावीच विसरलात? नो टेन्शन… आता आलं आहे ‘हे’ कुलूप!

असं कुलूप की चावी सांभाळण्याची कटकटच उरणार नाही

मुंबई : कुलूप म्हणजे संरक्षण करणारी गोष्ट. कोणतीही गोष्ट सांभाळून ठेवायची म्हटली की तिला कुलूप लावलं जातं. पण या कुलुपांची चावीच आपण विसरलो तर? कधीकधी घराला लावलेल्या कुलुपाची चावीही बाहेरु येईपर्यंत नेमकी कुठे ठेवली हेच आपण विसरुन जातो. यामुळे कुलूप तोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण आता या गोष्टीमुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. कारण बाजारात असे कुलूप आले आहेत की ज्यासाठी तुम्हाला चावी वापरावीच लागणार नाही, तर केवळ तुमच्या फिंगरप्रिंटच्या साहाय्याने तुम्ही हे कुलूप उघडू शकणार आहात.

घराची सुरक्षितता आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आता फिंगरप्रिंट बायोमेट्रिक पॅडलॉक (Keyless Lock) बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. ही लॉक सिस्टीम तुमच्या फिंगरप्रिंटने लॉक उघडते. त्यामुळे कुलुपाच्या चाव्या ठेवण्याच्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे.

Arcnics Rugged स्मार्ट फिंगर प्रिंट पॅडलॉक

हे फिंगर प्रिंट पॅडलॉक १० फिंगरप्रिंट सपोर्ट करते. म्हणजे तुमच्या घरातील १० सदस्य त्यांच्या बोटांचे ठसे जोडू शकतात. याचा फायदा असा होईल की कुलूप उघडताना एक सदस्य त्या ठिकाणी नसेल तर दुसरा सदस्य ते सहज उघडू शकेल. या लॉकची किंमत सामान्य लॉकपेक्षा थोडी आहे. त्याची मूळ किंमत ६,९९९ रुपये आहे. पण तुम्ही अ‍ॅमेझॉन (Amazon) वरून फक्त ३,६९० रुपयांना ते खरेदी करू शकता.

हेरलिच होम्स फिंगरप्रिंट पॅडलॉक (Herrlich Homes Fingerprint Padlock)

हे फिंगर प्रिंट पॅडलॉक तुमचे काम सोपे करते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे घर सुरक्षित ठेवू शकता आणि कुठेही आरामात प्रवास करू शकता. यात एकाच वेळी दोन लोकांच्या बोटांचे ठसे जोडता येतात. याव्यतिरिक्त ते USB केबलद्वारे चार्ज करता येते. त्याची मूळ किंमत ३,२९९ रुपये आहे. पण तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून फक्त १,५४९ रुपयांना खरेदी करू शकता.

Escozor Smart Heavyduty फिंगर प्रिंट पॅडलॉक

तुम्ही हे फिंगर प्रिंट पॅडलॉक तुमच्या फोनवरून देखील नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमच्या फोनवरून लॉक सिस्टम नियंत्रित करू शकता. या लॉक पॅडची मूळ किंमत ९,५०० रुपये आहे. तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून फक्त ६,९९० रुपयांना खरेदी करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -