Monday, June 24, 2024
Homeताज्या घडामोडीBARC Recruitment : मेगाभरती! भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी

BARC Recruitment : मेगाभरती! भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी

जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. बीएआरसी कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे रिक्त पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. बीएआरसीकडून सध्या मुंबई विभागातून वैद्यकीय अधिकारी आणि ऍडमिनिस्ट्रेटर या पदांवर भरती करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

पद आणि पदसंख्या

  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण १० रिक्त जागांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.
  • ऍडमिनिस्ट्रेटर या पदासाठी एकूण १ रिक्त जागेवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • ऍडमिनिस्ट्रेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसह मान्यताप्राप्त विद्यापीठातुन हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन

  • वैद्यकीय अधिकारी या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १ लाख ४ हजार ९९८ रुपये इतके वेतन देण्यात येईल.
  • ऍडमिनिस्ट्रेटर या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १ लाख ४ हजार ९९८ रुपये इतके वेतन देण्यात येईल.

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

  • वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखती घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी नोकरीच्या अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरावा.
  • तसेच फॉर्मसह आपले सर्व शैक्षणिक आणि नोकरीच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडावे.
  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ५० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • उमेदवारांनी या नोकरीच्या मुलाखतीसाठी वेळेवर हजर असणे अनिवार्य आहे.
  • या पदासाठी मुलाखतीची तारीख २० जून २०२४ अशी आहे.
  • मुलाखतीची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी ठेवण्यात आली आहे.
भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग अधिकृत वेबसाईट लिंक 

https://www.barc.gov.in/index.html

अधिसूचना लिंक 

https://www.barc.gov.in/careers/vacancy12.pdf

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -