Sunday, June 23, 2024
Homeताज्या घडामोडीमहाविकास आघाडीत सत्तेसाठी गँगवॉर!

महाविकास आघाडीत सत्तेसाठी गँगवॉर!

काँग्रेस-राष्ट्रवादी उबाठाला रस्त्यावर आणणार

शिवसेना सचिव माजी आमदार किरण पावसकर यांची घणाघाती टीका

मुंबई : नुकताच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत एम फॅक्टरच्या पाठिंब्याने निवडून आल्यानंतर कॉंग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या तीन तिघाडा आघाडीला आता राज्यातील सत्तेची स्वप्ने पडत आहेत. प्रत्येक पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे. यावरुन मविआची बांधिलकीही जनतेच्या प्रश्नांशी नसून सत्तेच्या खुर्चीसाठी असल्याची घणाघाती टीका शिवसेना सचिव माजी आमदार किरण पावसकर यांनी केली.

आज मविआ नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. मागील दोन दिवस उबाठा आणि काँग्रेस यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर आल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा काँग्रेसला विचारत न विचारत घेता परस्पर निर्णय घेत असल्याने काँग्रेसी नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि उबाठामध्ये प्रचंड तणाव झाला होता.

मविआमध्ये उबाठाची अवस्था मात्र ‘’न घर का ना घाट का’’ अशी झाली आहे. उबाठाचे उमेदवार मुसलमानांच्या मतांवर निवडून आले हे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.त्यांना मुंबईतील मराठी माणसाने हद्दपार केले आहे. हे वास्तव उबाठाने स्वीकारायला हवे, असे पावसकर म्हणाले. पण खोटं बोला पण रेटून बोला अशा वृत्तीने उबाठा आणि आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीत सत्तेची स्वप्न बघत आहेत. २०१९ मध्ये बापाने मुलाला जोर जबरदस्ती करुन कैबिनेट मंत्री केले. चार चार खाती सोपवली. आता मुलगा बापासाठी बॅटिंग करताना दिसत असल्याची टीका पावसकर यांनी केली.

महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षात दोन ते तीन नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. लवकरच लोकांना कळेल, कि महाभकास बिघाडी फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली आहे. ज्या आघाड्यांमध्ये वैचारिक बांधिलकी नसते त्यांचे लक्ष्य केवळ सत्ता हेच असते.

काँग्रेस आणि शरद पवार हे जुने आणि वैचारिकरित्या एकमेकांना पूरक पक्ष आहेत. त्यांना लोकसभेत एकूण २२ जागा मिळाल्या. उबाठाचे ९ खासदार आहेत. येत्या दिवसामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येवून उध्दव ठाकरेंचा गेम करणार आहेत.महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन उध्दव ठाकरेंना रस्त्यावर आणतील, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला. २१ जागा लढलेल्या उबाठाकडे ११ उमेदवार बाहेरून आणलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणाऱ्या उबाठाकडे निवडणूक लढण्यासाठी २० उमेदवार पण नसतील, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य करुन महाविकास आघाडीतील इतर पक्षांची गोची केली आहे. ते म्हणाले की, लोकांना कळलंय की उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही. अनिल परब यांच्यावर अनेक केसेस आहेत. माझ्यावर एक केस आहे. लोकांच्या हक्कांसाठी परब यांनी अंगावर केसेस घेतल्या असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी पक्षाचा दावा सांगितला आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षात खूप अनुभवी नेते आहेत. त्यात जयंत पाटील हे सर्वात जास्त अनुभवी नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून पाच ते सात वर्ष पद सांभाळले आहे. ते नक्कीच सक्षमपणे नेतृत्व करु शकतात, असं सूचक विधान रोहित पवार यांनी केले आहे. यावरुन आघाडीतल्या पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा उफाळून आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -