बार्बाडोस: भारताचा क्रिकेटर सूर्यकुमार यादवच्या तडफदार अर्धशतकीय खेळीमुळे भारताने अफगाणिस्तानला १८२ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केली.
भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.
भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.
शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. अफगाणिस्तानला विजयासाठी १८२ धावांची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानकडून दोन गोलंदाजांना प्रत्येकी ३ विकेट काढता आल्या. फझलहक फारूकी आणि रशीद खान यांनी भारताच्या डावाला सुरूंग लावण्याचे काम केले.