Friday, March 28, 2025
Homeक्रीडाENG vs SA: अटीतटीच्या लढतीत द. आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय

ENG vs SA: अटीतटीच्या लढतीत द. आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय

मुंबई: शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ६ धावांनी हरवले. हा सुपर ८मध्ये दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा विजय आहे त्यामुळे त्यांचे सेमीफायनलमध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडने खराब सुरूवात केली आणि पहिल्या १० षटकांतच इंग्लंडचा संघ अडखळताना दिसला.

इंग्लंड संघाची धावसंख्या ११ ओव्हरपर्यंत ४ बाद ६१ इतकी होती. यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या ७८ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले. मात्र ते विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

आफ्रिकेच्या १६३ धावा

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा खेळताना १६३ धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉक आणि रीजा हेंड्रिक्स यांच्यात ८६ धावांची सलामी भागीदारी झाली. एकावेळेस असे वाटत होते की आफ्रिका सहज २०० धावांचा आकडा पार करेल. मात्र संघाने मधल्या ओव्हरमध्ये केवळ ५२ धावा झाल्या. क्विंटन डी कॉकने ३८ बॉलमध्ये ६५ धावा केल्या यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर डेविड मिलरनेही २८ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी करत आफ्रिकेला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -