Friday, October 4, 2024
Homeराशिभविष्यWeekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २३ ते २९ जून २०२४

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २३ ते २९ जून २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २३ ते २९ जून २०२४

सुख-सुविधांमध्ये वाढ

मेष : सुरुवातीलाच सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. शुभ बातम्या मिळतील. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे, विक्री वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे. जुनी काही राहिलेली कामेसुद्धा पूर्ण होणार आहेत. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये थोडेसे मानसिक तणाव राहणार आहेत. या कालावधीमध्ये आपण धैर्याने, सावधतेने पावले टाकली पाहिजेत. सामाजिकदृष्ट्या मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सावध राहिले पाहिजे. तसेच काही अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे जी व्यक्ती शासकीय कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे.

संपन्नता वाढणार आहे

वृषभ : या सप्ताहात ग्रह योग आपणास अनुकूल असणार आहे. तुम्ही विचार केलेले आणि नियोजित केलेली कामे त्याचप्रमाणे होणार आहेत. भौतिक सुखाबरोबरच ऐश्वर्यसंपन्नता वाढणार आहे. आनंदात व मौजमजेत वेळ घालवणार आहात. बराच काळ घरातील वादळ असतील, ते संपणार आहेत. आपल्या मुलांकडून काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपला मान, प्रतिष्ठा, सामाजिक स्तर उंचावणारा हा कालावधी असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगले लाभ मिळणार आहेत, तरी आता परत गुंतवणुकीचा प्रश्न समोर येणार आहे. त्याचा निर्णय मात्र अतिशय विचारपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. आपण संपत्ती खरेदी करू शकता.

उत्साह वाढणार आहे

मिथुन : आपल्या राशीतील शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे प्रेमीयुगुलांसाठी हा कालावधी आहे. तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकता. शिवाय हा कालावधी आपल्या घरच्यांना सांगू शकता. आपली एनर्जी लेव्हल उच्चप्रतीची असणार आहे. आपणास एखादी चांगली बातमी समजू शकते किंवा खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आपणास मिळू शकतात. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आताचे वातावरण आपणासाठी सुखदायक असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांना सहाय्य मिळणार आहे. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाढणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे.

आनंद आणि आशा

कर्क : ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये निरसता आली होती किंवा कंटाळवाणे जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी, आपण कोणतीही कसर सोडणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी महाग भेटवस्तू देखील त्यांना देऊ शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पूर्वीचे काही येणे असेल, ती येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना संततीसाठी बरेच दिवस वाट बघायला लागली आहे, त्यांच्यासाठी संतती प्राप्तीचे शुभयोग येत आहेत.

आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर

सिंह : आपल्या राशीतून शुभ ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्यासाठी आर्थिक बाबतीत खूप चांगले राहणार आहे. गुंतवणूक करायची असल्यास, दीर्घ मुदतीची गुंतवणूक आपण करू असून अर्थप्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करणार आहात. कमी कष्टात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपली पार्टनरशिप असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपणास आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत आई-वडिलांशी काही वाद-विवाद होऊ शकतात; पण वडिलांकडून प्रत्यक्षात फायदा होण्याची आशा आहे. एकूणच आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर असणार आहे.

मित्रांचा सहयोग मिळणार

कन्या : व्यापार-व्यवसायामध्ये अपेक्षित आर्थिक फायदा होणार नाही. उत्पन्न कमी असल्यामुळे आणि जास्त खर्च असल्यामुळे आपली बचत खर्च होण्याची शक्यता आहे. आपणांस मित्रांचा सहयोग मिळणार आहे. लहान बहिणीचे प्रेमप्रकरण समोर आल्यामुळे, आपली मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे. पण मुलगा आपल्याच जातीचा असल्यामुळे, पुढे हे लग्न होण्याची शक्यता आहे. आपली एखादी महत्त्वाची वस्तू बरेच दिवसांनी मिळणार आहे. नोकरीत वातावरण सकारात्मक असेल.

नाव आणि कीर्ती मिळणार

तूळ : परिवारामध्ये शांतीचे वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये जे काही गैरसमज झाले होते, ते दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे, या यशामुळे आपले स्थान आपण बळकट करणार आहात. आपले खाणे-पिणे आपण वेळेवर करावे, अन्यथा त्याचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी आपणास स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. आपली मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे. आपली वाटचाल धैर्याने व संयमाने होणार आहे. आर्थिकदृष्टीने आपण समाधानी राहाल. आपणास नाव कीर्ती मिळणार आहे.

मान-सन्मानात वाढ

वृश्चिक : व्यापार व्यावसायिकांना अतिशय चांगला कालावधी आहे. ज्यांचे व्यवसाय हॉटेल, रेस्टॉरंट अशा प्रकारचा व्यापार आहे, त्यांना अतिशय उत्तम. परदेशी प्रवासी योग येतील आणि इतरही व्यक्ती येऊन हॉटेल फूल असणार आहेत. हा व्यवसाय जोरात चालणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना पण हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन प्रस्ताव येतील, कामे भरपूर प्रमाणात मिळतील, प्रसिद्धी भरपूर होईल. नोकरीमध्ये चांगली स्थिती असेल. मानसन्मानत वाढ होईल. आपणास विविध मार्गाने धनप्राप्ती होणार आहे.

उत्तम कालावधी आहे

धनु : हा चांगला कालावधी आहे. ज्या व्यक्ती शासकीय कामामध्ये आहेत, त्यांना प्रमोशन मिळू शकते. ज्या व्यक्ती खासगी नोकरी करतात, त्यांना पगारवाढ मिळू शकते. जर आपल्यामध्ये जास्त चांगली क्षमता असल्यास, मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आपली नियुक्ती होऊ शकते. आपल्या कार्यकुशलतेमुळे आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला चांगले यश मिळणार आहे. व्यापारामध्ये वाढ करायची असेल तर काही जोखीम उचलावी लागणार आहेत. आपणासाठी हा उत्तम कालावधी आहे.

जोडीदाराचे सहाय्य

मकर : भागीदारीमध्ये काही आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये जर आपला जोडीदार नोकरी किंवा काही काम करत असेल, तर आपल्यामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. हे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. गैरसमज दूर झाल्यावरच वैवाहिक जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. त्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. जोडीदाराबद्दल थोडी सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे. व्यापार-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास, चांगल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतला तरच आपल्याला अपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी आपला जोडीदार आपल्याला सहाय्य करणार आहे.

आनंददायक कालावधी

कुंभ : शेअर बाजारामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तसेच जमीन-जुमलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. यात्रा कंपनींना हा कालावधी व्यापारी दृष्टीने चांगला आहे. त्यात विदेसशी प्रवास कंपनी यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर तसेच बिल्डिंग मटेरियल संबंधित व्यावसायिकांना आर्थिक लाभ उत्तम होणार आहे. मात्र गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे किंवा घरामध्ये नूतनीकरणाचे काम करून घ्याल. हा कालावधी आपणास आनंददायी ठरणार आहे.

सकारात्मक दृष्टीने पुढे जावे                                            

मीन : आपले वरिष्ठ त्यांचे स्वतःचे काम तुमच्यावर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. आपले मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपणास वाटले तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की, आपली बदली व्हावी. महिलांना सासरी कलह किंवा वाद-विवादाला सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी आपण आपला आत्मविश्वास वाढून, धीराने सामोरे गेले पाहिजे. हा कालावधी जास्ती चालणार नाही. त्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टीने पुढे जावे लागणार आहे, तर आपली प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांनी जास्त कष्ट घेतले पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -