Sunday, June 23, 2024
Homeक्राईमPune car accident : पुणे कार अपघात प्रकरणी बापलेकाला आज कोर्टात हजर...

Pune car accident : पुणे कार अपघात प्रकरणी बापलेकाला आज कोर्टात हजर करणार!

नागरिकांच्या संतापानंतर आज नव्याने गुन्हा होणार दाखल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात (Kalyani Nagar Accident) रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या अपघातानंतर अवघ्या ५ तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असल्याने आता पुणे पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘एफआयआरमध्ये ५ आरोपी होते, त्यापैकी ३ आरोपींना आम्ही रात्री उशिरा अटक केली. त्यांना आम्ही न्यायालयात हजर करू. बाल हक्क न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणातला आरोपीला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलीस तातडीने त्याला अटक करणार आहेत. पुणे पोलिसांनी वकिलांमार्फत आरोपीला नोटीस पाठवली आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा नोटिशीत उल्लेख आहे’, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड घडणार आहे.

आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर आज दुपारी २ वाजता हजर केले जाणार आहे. तसेच आरोपीचा फॉरेन्सीक रिपोर्ट देखील येणार आहे. अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमं देखील वाढवली आहेत. आरोपीवर मोटार वाहन कायद्यातील १८५ च्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८५ कलमानुसार दारु पिवून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले. ज्या दिवशी अपघात झाल्या त्याच दिवशी गुन्हा दाखल करायला हवा होता असं नागरिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आरोपीला आज बाल न्याय मंडळासमोर नेण्यात येणार आहे. अल्पवयीन प्रकरणात मोडतं म्हणून आरोपीला जामीन मिळाला असं म्हटलं जात होतं. मात्र पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ गटामध्ये गणलं जावं यासाठी नव्याने अर्ज केला आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना काय आदेश मिळतील, हे पाहणे महत्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -