Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीNobel Prize : कोरोना लस शोधणाऱ्या कैटेलनि कैरिको आणि डू वीजमैन यांना...

Nobel Prize : कोरोना लस शोधणाऱ्या कैटेलनि कैरिको आणि डू वीजमैन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या वैज्ञानिकांना यंदाचा जगभरातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचं दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केलं. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग कोरोनाच्या काळात लढत होतं त्यावेळी २०२० मध्ये लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या दोघांनी शोध लावलेल्या या लशीचा वापर केला. पुढे बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नानं वीआसी/ एनआयएच यांच्या सहकार्यानं लसींची निर्मिती केली.

कैटिलिन कैरिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण केलं. पुढे त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक बनल्या. २०१३ नंतर कैटलिन कैरिको या बायोएनटेक आरएनए या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बनल्या.

ड्रू वीजमैन यांचा जन्म १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण केली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं. १९९७ मध्ये त्यांनी स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु केला. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.

दरम्यान, १९५१ साली अशीच परिस्थिती होती. जेव्हा पिवळ्या तापाने जगाला धडकी भरवली होती, त्यावेळी मॅक्स थेलर यांना या रोगावरील लस विकसित केल्याबद्दल औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -