Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीPMPML Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या पीएमपीएमएलचे तिकीट काढता येणार

PMPML Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या पीएमपीएमएलचे तिकीट काढता येणार

पासही काढू शकता ऑनलाईन

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Pune news) समोर आली आहे. पुणेकरांना प्रवासासाठी अत्यंत सोयीच्या अशा पीएमपीएमएल बसचे (PMPML Bus) तिकीट घरबसल्या काढता येणार आहे. एवढंच नव्हे तर आता पासही ऑनलाईन पद्धतीने काढणे सहज शक्य होणार आहे. पीएमपीएमएलच्या ॲपसह खासगी कंपन्यांची सेवा लवकरच पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थाच पीएमपीएमएलच्या प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. अंतिम चाचण्या झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये हे ॲप पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. प्रवाशांना ॲपवरून तिकीट काढण्याच्या सेवेसोबतच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाईन तिकीट आणि बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. याचा फायदा लवकरच पुणेकरांना होणार आहे.

पुणेकरांना या ॲपच्या माध्यमातून ज्या बसने जायचे आहे त्या बसची सर्व माहिती घरबसल्या पाहून त्यांना तिकीट काढता येणार आहे. प्रवासी याद्वारे बसचे वेळापत्रक देखील पाहू शकतात. घरबसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना केवळ वाहकाला क्यूआर कोड दाखवताच तिकीट मिळणार आहे. पीएमपी बसच्या सर्व मार्गाची माहिती देखील यावर प्रवाशांना मिळणार आहे.

पासही ऑनलाईन काढता येणार

पीएमपीचे पास ॲपद्वारे काढण्याची सोय देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बस डेपोमध्ये जाऊन पास काढण्याचा त्रास कमी होणार आहे. आता त्यांना थेट ऑनलाईनच पास मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -