Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडाT20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

T20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

मुंबई: टी-२० क्रिकेटम(t-20 cricket) अनेक क्रिकेटर आपल्या तुफानी अंदाजात शतक झळकवत असतात. आतापर्यंत प्रोफेशनल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावर होता. ज्याने आयपीएल २०१३मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ३० बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते. आता एस्टोनियासाठी खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडू साहिल चौहानने केवळ २७ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला.

एस्टोनिया सध्या सायप्रसचा दौरा करत आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ६ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत या २ सामन्यांमध्ये एस्टोनियाने विजय मिळवला आहे.

मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

टी-२० क्रिकेटमध्ये क्रिस गेलने ३० चेंडूत शतक ठोकले होते. आता १७ जूनला एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला गेला. यात यजमान सायप्रसने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ विकेट गमावताना १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल एस्टोनियाने ९ धावांवर आपले पहिले २ विकेट गमावले. मात्र साहिल चौहान फलंदाजीसाठी आला आणि येताच त्याने चौकार-षटकारांचा पाऊस सुरू केला. चौहानने २७ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. संपूर्ण सामन्यात त्याने ४१ बॉलमध्ये १४४ धावा ठोकल्या. यात त्याने १८ षटकार आणि ६ चौकार लगावले.

कोणत्या भारतीयाच्या नावावर आहे वेगवान शतक

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये ऋषभ पंतचे नाव आहे. २०१८मध्ये आपल्या डोमेस्टिक करिअरदरम्यान दिल्लीसाठी खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध ३२ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -