मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवले. या विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ २० षटकांत ७ बाद १८१ धावा करता आल्या.
भारतासाठी रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली त्यानंतर अर्शदीप सिंहने गोलंदाजीत दम दाखवला. अर्शदीप सिंहने ४ षटकांत ३७ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. या गोलंदाजाने डेविड वॉर्नरशिवाय टीम डेविड आणि मॅथ्यू वेड यांना बाद केले.
या टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंह अफगाणिस्तानच्या फलउल्लाह फारूखीसोबत टॉपवर पोहोचला आहे. या दोन गोलंदाजांच्या नावावर १५-१५ विकेट आहेत.यानंतर बांगलादेशता रिशाद हौसेन आहे. या खेळाडूच्या नावावर १४ सामन्यांत १३.८६च्या सरासरीने १५ विकेट आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आणि वेस्ट इंडिजच्या अल्जारी जोसेफने प्रत्येकी १३ विकेट घेतल्या आहेत. या पद्धतीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपचे नाव घेतले जाते.