मुंबई: जास्त झोप ही आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुम्ही संपूर्ण रात्रभर झोपला आहात आणि त्यानंतरही दिवसभरात तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही सावध होणे गरजेचे आहे. कारण हे मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात.
जास्त आणि कमी झोपणे दोन्हीही शरीरासाठी हानिकारक आहेत. काही लोकांमध्ये जास्त झोपण्याची तर काहींमध्ये कमी झोपण्याची सवय अशते. काही लोक रात्रीचे ८ ते १० ता झोपतात मात्र त्यानंतरही दिवसभरात त्यांना झोप येत असते. ही सवय चांगली नाही. ओव्हर स्लिपिंगचे कारण हायपरसोमनिया नावाचा आजार असू शकतो.
या आजारामध्ये रात्री भरपूर झोप घेतल्यानंतरही दिवसभर झोप येत राहते. अनेकदा तर काम करतानाही झोप येते.
आरोग्य तज्ञांच्या मते या आजाराचे योग्य कारण काय आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, काही रिसर्चनुसार हा आजार जेनेटिक असू शकतो.
जर कोणी लठ्ठपणाची शिकार होत असेल तर त्यांना हा आजार लवकर होतो. अनेक केसेसमध्ये पार्किसन्स आजारही कारण ठरू शकतो.
मनोरुग्ण तज्ञांनुसार मानसिक अवस्था ठीक नसल्याने आजकाल लोक तणावात जात आहे. याचा उलटा प्रभावही पडू शकतो. यामुळए हायपरसोमनिया आजार होऊ शकतो.