Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीईएमसी सायबर सेलकडून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

ईएमसी सायबर सेलकडून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

१० संगणक संचासह २ राऊटर केले हस्तगत

पनवेल : ईएमसी सायबर सेल पनवेल यांच्याकडून इंदोर येथील आणखी एक बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तंत्रज्ञान अधिनियमन ६६(सी), ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेल पनवेल यांनी इंदोर येथील तुकोगंजमधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरिता चालविले जाणारे एक फ्रॉड कॉल सेंटर उद्ध्वस्त केले.

सदर गुन्ह्याचा सखोल व तांत्रिक तपासामध्ये गुन्ह्याच्या टोळीचा मुख्य सुत्रधार हा देवास, मध्यप्रदेश येथे असल्याचे या पथकाला समजून आले. त्यानुसार सदर पथकाने त्या ठिकाणी जावून मुख्य सुत्रधार यश उंबरकर याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने फ्रॉड कॉल सेंटर चालवित असल्याची कबुली दिली. त्यानुसार सदर ठिकाणी या पथकाने छापा टाकून १० डेस्कटॉप, १० सीपीयु व ०२ राऊटर हस्तगत केले आहेत.

सदर कामगिरी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ईएमसी सायबर सेलच्या पो. नि. दिपाली पाटील, मसपोनि वृषाली पवार, पो. हवा. वैभव शिंदे, तुषार चौधरी, म.पो. हवा. प्रगती म्हात्रे, पो.ना. दादासाहेब माने, पो.शि. संतोष चौधरी या पथकाने या गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास ईएमसी सायबर सेलच्या पो.नि. दिपाली पाटील करीत आहेत.

टेलिग्राम, व्हॉटसअप, इंस्टाग्राम, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन ओळख करून जर कोणी शेअर मार्केट गुंतवणक व इतर ऑनलाईन कामाचे प्लॅन सांगून वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल तर त्याबाबत सतर्क रहावे. ऑनलाईन फसवणुकीची तक्रार टोल फ्री क्र.1930 किंवा cybercrime.gov.in येथे त्वरित करावी – पोलीस उपायुक्त विवेक पानसरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -