मुंबई: जगात असे अनेक देश आहेत जिथे कामाचे तास खूप कमी आहेत. यात अनेक युरोपियन देशांचे नाव आहे. अशातच या देशांमध्ये वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगले आहे.
आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगत आहोत जेथे आठवड्याला सगळ्यात कमी कामाचे तास आहेत.
या यादीत ऑस्ट्रियाचा नंबर पाचवा लागतो. येथील कर्मचारी केवळ आठवड्याला २९.४ तास काम करतात.
स्वीडन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. येथील कर्मचाऱ्यांचे सरासरी कामाचे तास २९.२ तास आहेत.
युरोपियन देश फिनलँडमध्ये सरासरी कामाचे तास २८.९ तास आहे.
नॉर्वे हा देश दुसऱ्या स्थानावर आहे. येथे कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात २७.१ तास काम करावे लागते.
नेदरलँड्स हा जगातील असा देश आहे जिथे कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी खूप कमी आहे. येथील लोक आठवड्यातील केवळ २६.७ तास काम करतात.