Tuesday, June 25, 2024
Homeताज्या घडामोडीआता ग्रामीण भागातही फोर जी, फाईव्ह जीची सेवा मिळणार

आता ग्रामीण भागातही फोर जी, फाईव्ह जीची सेवा मिळणार

बीएसएनएलचे महाप्रबंधक महाजन यांची माहिती

नाशिक (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलला पॅकेज घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बीएसएनएल आता ग्रामीण भागासह शहरी भागात ४ -जी आणि ५- जीची सेवा देण्यासाठी जोमाने पावले टाकण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलला १६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या बीएसएनएलला ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती देताना बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात या घोषणेमुळे ग्रामीण भागात बीएसएनएल फोर -जी आणि फाईव्ह -जी ची सेवा देणार आहे.

विशेष म्हणजे भारत ब्रॉड बॅण्ड नेटवर्क लिमिटेड या कंपनीचेही बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे १४ लाख किलोमीटर फायबर ऑप्टिकलचे जाळे असणारी जगातील मोठी नेटवर्क कंपनी म्हणून बीएसएनएल उदयास आली आहे. भारत ब्रॉड बॅण्ड नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देशभरातील सहा लाख ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकलने जोडण्यात आल्या असून आता ही कंपनीदेखील बीएसएनएलमध्ये विलीन करण्यात आली.

त्यामुळे बीएसएनएलची स्वतःची साडेआठ लाख किमी व बीबीएनएलची साडेपाच लाख किलोमीटर अशी एकूण १४ लाख किमी. फायबर ऑप्टिकल असलेली देशातील एक नंबर तर जगातील मोठी नेटवर्क कंपनी म्हणून बीएसएनएलची ओळख निर्माण झाली आहे. देशातील सर्व खासगी नेटवर्क कंपन्यांचे मिळून फायबर ऑप्टिकलचे जाळे ५ लाख किमी. असल्याची माहिती उपमहाप्रबंधक राजेश हिरे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -