Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमीरा-भाईंदरमधील सहा महिन्यांत सोळाशेहून अधिक गुन्हे उघडकीस

मीरा-भाईंदरमधील सहा महिन्यांत सोळाशेहून अधिक गुन्हे उघडकीस

मीरा रोड (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन दोन वर्ष होण्यास आली असून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात खून (२४), खुनाचा प्रयत्न (१८), चोरी, दरोडा (४), चैन जबरी चोरी (१७), इतर जबरी चोरी (१११), दिवसा घरफोडी (२६), रात्री घरफोडी (२२९), वाहनचोरी (४०७), बलात्कार (१६४), विनयभंग (३०२), जुगार(६८), एनडीपीस (४४५), अशा अनेक गुनह्यांचा सामावेश आहे. गेल्या सहा महिन्यात (१) जानेवारी ते ३० जून २०२२ पर्यंत अशे अनेक गुन्हे घडले असून त्याची संख्या २३७९ असून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांची संख्या जवळपास १६४७ आहे. गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जानेवारीपासून ते जूनपर्यंत दाखल गुन्ह्याच्या आकडेवारीकडे बघता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत असून हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वेळोवेळी वाढत आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार शहराची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. या शहरात सर्व देशातील विविध जाती धर्माची लोक राहत आहेत. आयुक्तालय होण्यापूर्वी गुन्हे घडत होते; परंतु ते उघडकीस येत नव्हते. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरात घडणाऱ्या गुन्ह्याची दखल घेऊन ते गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचा आकडा मोठा दिसून येतो.

पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची राज्य शासनाने या शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीच नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तांना स्वतः भेटून आपल्यावर झालेला अन्याय सांगण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याने सर्वजण आपल्यावर झालेला अन्याय आयुक्तापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत व दहशतीखाली न राहता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढे येऊन गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १६ पोलीस ठाणे येत असून या पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -