Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहेवी डिपॉझिटचे अ‍ॅग्रीमेंट

हेवी डिपॉझिटचे अ‍ॅग्रीमेंट

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

मुंबईसारख्या शहरामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे. कारण मुंबई शहर औद्योगिक शहर असल्यामुळे दिवसेंदिवस परप्रांतीयांचे लोंढे या शहराकडे वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच राहण्याचे प्रश्न उद्भवत असल्यामुळे नोकरीनिमित्त येणाऱ्या लोकांसाठी भाड्याच्या रूमशिवाय पर्याय राहत नाही. भाड्याने रूम घेताना महिन्याचं भाडं, त्यासाठी वर्षासाठी लागणारे डिपॉझिट तर काही हेवी डिपॉझिटवर लोक भाड्याने रूम घेतात. त्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी अ‍ॅग्रीमेंट बनवलं जातं ते रूम मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये असते. रूम खाली करताना रूम मालक त्यांचे डिपॉझिट किंवा हेवी डिपॉझिट देऊन रूम खाली करून घेतो किंवा हीच अ‍ॅग्रीमेंट पुढे वाढवली जाते.

शीला हिने सासरचे लोक व्यवस्थित वागत नाहीत व पती दारू पिऊन नेहमी त्रास देतो म्हणून त्यांच्याविरुद्ध डोमेस्टिक वायलेंस केस टाकली होती. हे सासरच्या लोकांना कळताच त्यांनी तिच्या पतीला आनंदला मुंबईला पाठवलं व तुम्ही रूम घेऊन व्यवस्थित संसार करा असा सल्ला दिला. शिलाने घरकाम करून, लोकांची भांडी-धुणी करून काही रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम आपल्या परिचित लोकांकडून गोळा करून तीन लाखांपर्यंत रक्कम तिने आपल्या सासऱ्यांकडे दिली व हेवी डिपॉझिट रूम बघण्यास सांगितले. कारण तिला दर महिन्याला भाडं देण्यासाठी जमणार नव्हतं. कारण दोन मुली, एक मुलगा असल्यामुळे मुलांचा शाळेचा, खाण्यापिण्याचा खर्च सर्व काही जबाबदारी शिलावरच होती. त्यामुळे तिने हेवी डिपॉझिट हा पर्याय शोधला. नवरा व्यसनी असल्यामुळे तिने सर्व रक्कम सासऱ्यांकडे दिली. सासऱ्याने मालकाला ती रक्कम देऊन त्याने आपल्या नावाचं अ‍ॅग्रीमेंट बनवून घेतले. पण चेक देताना मात्र शीला यांनी मालकाला चेक दिलेला होता.

शीला कुटुंबासोबत त्या रूममध्ये राहू लागली. शीलाच्या चुलत भावाने तिच्या नवऱ्याला म्हणजे आनंदलाही कामावर लावलेलं होतं. चांगल्या प्रकारे त्यांचा संसार चालू होता. मोठी मुलगी आयटी करत होती तर दुसरी मुलगी दहावीला होती. याचवेळी आनंदला नेमकं काय झालं ते कळेना. तो बायको आणि मुलांना तिथेच ठेवून गावी गेला. आणि बायको आणि मुलांना गावाला या, मुंबईत राहण्याची काही गरज नाही असं सांगू लागला. मुलींना गावाला आणून त्यांची आपण लग्न करून देऊया असा तो शीलाच्या मागे तगादा लावू लागला. दोन्ही मुली शिकत होत्या. शीलाचं म्हणणं असं होतं की मुलींचे शिक्षण पूर्ण होऊन मुली कामाला लागतील मग आपण गावी जाऊया. पण सासू-सासरे म्हणत होते गावीच कामधंदा कर आणि घराकडे लक्ष दे आणि आमची सेवा कर. शीला असं बोलत होती की त्यांच्या घरामध्ये तीन सुना आहेत. दोन-दोन वर्षांनी प्रत्येक सुनाला घराच्या बाहेर काढतात. एका सुनेला बाहेर काढलं तर दुसऱ्या सुनेला बोलवतात. काही काळानंतर दोन-तीन वर्षांच्या आत तिला बाहेर काढतात आणि तिसरीला बोलवतात हे सतत करत असतात. गावी नवरा काय एक रुपया कमावणार नाही आणि मी मरमर मरायचं आणि मला कोण काय देतं का? माझ्या मुलांना कोण देतं का याची वाट बघत बसायची असं तिने यापूर्वीच आयुष्य जगलेलं होतं.

शीलाच्या सासऱ्यांनी रूम मालकाला फोन करून सांगितलं की, मी दिलेले तीन लाख रुपये डिपॉझिटचे परत द्या आणि माझ्या सुनेला आणि तिच्या मुलांना घराच्या बाहेर काढा. हे शीलाला समजल्यावर शीलाने रूम मालकांना सांगितलं की ते सासऱ्याचे पैसे नसून माझे पैसे होते. घरात करता माणूस व्यसनी असल्यामुळे मी सासऱ्यांना दिले होते आणि सासऱ्यांना सांगितलं अ‍ॅग्रीमेंट बनवा तर सासऱ्याने ते स्वतःच्या नावावर बोलून आम्हाला या रूममध्ये ठेवलेलं होतं. रूम मालक खरंच आता दोन्ही बाजूने अडकला होता. शीला बोलत होती की ते पैसे माझे आहेत ते तसेच ठेवा आणि अ‍ॅग्रीमेंट पुढे वाढवा. रूम मालकाचं सर्वात मोठं हे चुकलं होतं की अ‍ॅग्रीमेंट शीलाच्या सासऱ्यांबरोबर केलेलं होतं अ‍ॅग्रीमेंट केलेली व्यक्ती त्या रूममध्ये भाडोत्री म्हणून राहत नव्हती, तर त्यांची सून शीला भाडोत्री म्हणून राहत होती. पैसे नेमके कोणाला द्यायचे कारण सासऱ्याला दिले तर शीला घराच्या बाहेर निघणार नव्हती. कारण तीन वर्षे शिला आपल्या मुलांसोबत रूममध्ये राहत होती. त्याच्यामुळे डिपॉझिटचे पैसे होते ते तिला मिळाले तरच ती दुसऱ्या ठिकाणी रूम घेण्यासाठी जाणार होती. पण घरमालकाच्या एका चुकीमुळे घरमालक या प्रकरणात अडकलेला होता.

पोलिसांनी आणि वकिलाने घर मालकाला व्यवस्थित समजवले होते की, तुम्ही अ‍ॅग्रीमेंट केलेत पण दुसरीच व्यक्ती घरात राहत होती. तुम्ही नेमकी काय चौकशी केली होती? आपण ज्यावेळी भाडोत्री ठेवतो त्यावेळी भाडोत्रीशी घरमालकाने अ‍ॅग्रीमेंट केलं पाहिजे होते, ती चूक घर मालकाने केली होती. घर मालक आणि भाडोत्री यांनी रूम घेताना आणि देताना ते अ‍ॅग्रीमेंट नेमकं कोणात केलं पाहिजे याची जाणीव ठेवून जर ते अ‍ॅग्रीमेंट केलं तर रूम मालक आणि भाडोत्री अडचणीत येणार नाहीत.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -