Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीरत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह

सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात मंगळवारी शांततेत कुठेही अनुचित प्रकार न घडता सुमारे ६७ टक्के मतदान झाले. केंद्रीय मंत्री,भाजप नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघात भाजप व महायुतीतील मित्र पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. मंगळवारी सकाळपासुनच मतदारांचा उत्साह कमालीचा वाढला होता. दुपारी हा उत्साह काही भागात कमी झाला मात्र शेवटच्या तासाभरात मतदानासाठी मतदारांची धावपळ उडाली. काही मतदार संघात वेळ संपली तरी केंद्रावर गर्दी झाल्याने टोकण देत सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

दरम्यान केंद्रावरुन तालुक्याच्या ठिकाणी पोहोचत निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतपेट्या जमा करण्याची प्रक्रिया रात्री १० नंतरही सुरु होती. रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील ७ केंद्रावर मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्यात तातडीने पर्यायी व्यवस्था केली होती. रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार ७१७ मतदान केंद्रावर सुमारे ६७ टक्के मतदारांनी मताधिकार बजावला. आता सर्वांचे लक्ष ४ जूनकडे लागले असून ९ उमेदवारांचे निवडणूक भवितव्य मतपेटी बंद झाले आहे.

जे अभ्यास करत नाहीत, त्यांना पेपर अवघड जातो. पण मला पेपर कठीण जात नाही असे म्हणत मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. मंगळवारी राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा वरवडे-फणसवाडी येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सौ.निलमताई राणे,सौ.प्रियंकाराजे निलेश राणे यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.मतदार संघातील दौऱ्यानंतर माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, सौ.नंदीता राणे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मी नेहमीच परीक्षेला बसतो, त्यामुळे मला पेपर सोपा वाटतो. मी अभ्यास करून पेपरला बसतो. जे अभ्यास करत नसतात त्यांना पेपर अवघड जाणार, पण मला पेपर कठीण जात नाही, असा टोला राणे यांनी लगावला. यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे.

४०० खासदार महायुतीचे निवडून येणार

राणे यांनी मतदारांना आवाहन केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की, या निवडणुकीत मी उमेदवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारची घोषणा केलेली आहे. देशात ४०० खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत. कोकणातील जनतेने भरभरुन प्रेम दिले आहे, देत आहेत, असेही ते म्हणाले.

उबाठाला पराभव दिसत असल्याने खोटे नाटे आरोप-आमदार नितेश राणे

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय निश्चित झाला आहे. उबाठा सेनेची विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची आमच्यासोबत ताकद नाही. पक्षप्रमुखांनी व अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढी आमच्यावर टीका केली. पण आतापर्यंत ते लोक एकदाही बोलू शकले नाहीत की, विनायक राऊत यांनी काय केले. गेली दहा वर्ष नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील मुलांसाठी कोणते रोजगार दिला म्हणून मैदानात हरवू शकले नसल्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. त्यामुळे एक निश्चित पद्धतीने सिद्ध होते की विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे. त्यांना पराभव कळून चुकलेले आहे. कारण नारायण राणे हे जिंकलेले आहेत. फक्त आता लीड जवळपास साडेतीन लाखाने वाढत चालले आहे.असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -