Tuesday, May 21, 2024
Homeनिवडणूक २०२४MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना...

MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना मोजताही येईना!

मध्यप्रदेशमध्ये सापडला पैशांचा डोंगर

मध्य प्रदेश : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना या काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा निवडणुकींच्या काळात पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अथक प्रयत्न केले जातात. मात्र तरीही मोठ्या संख्येत पैशांचे व्यवहार होत असतानान दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच भांडूप, सायन, झारखंड परिसरात पोलिसांनी संशयित रक्कम जप्त केली होती. ते प्रकरण ज्वलंत असतानाच आता भोपाळमध्ये एका घरात पैशांचा ढिगारा सापडल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या पंत नगर कॉलनीत कैलाश खत्री नावाच्या व्यक्तीच्या घरातून मोठ्या रोख स्वरूपात रक्कम जप्त करण्यात आली आहे. कैलाश खत्री याने मागील १८ वर्षांपासून मनी एक्स्चेंजचं काम करत असल्याचं कबूल केलं. त्याने पाच, दहा आणि वीस रुपयांच्या खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेत (Money Exchanger) आणि ग्राहकांना नवीन नोटा देत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. याबाबतची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून नोटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिसांनाही त्या अजून मोजता आलेल्या नाहीत.

दरम्यान, पोलिसांनी नोटा जप्त केल्या असून त्या नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. अद्यापही युवकाकडे कोणते संशयास्पद दस्तऐवज सापडले नाहीत. त्याच्यावर अजून कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असेल, तर दखल घेतली जाईल असं आयकर विभागाने सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -