Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIPL 2024कुठून आली IPLची ही ट्यून? १७ वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करतेय राज्य

कुठून आली IPLची ही ट्यून? १७ वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करतेय राज्य

मुंबई: भारतात सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामाची धूम आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळवण्यात आला होता. या १७ वर्षांत अनेक बदल आयपीएलमध्ये झाले. मात्र आयपीएलची ट्यून बदलली नाही. खरंतर, गेल्या १७ वर्षांत आयपीएलची ट्यून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की ही ट्यून कुठून आली. याचा इतिहास काय आहे?

जाणून घ्या आयपीएल ट्यूनचा इतिहास

खरंतर, फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की आयपीएलची ट्यून पारंपारिक स्पॅनिश ट्यून आहे. ही ट्यून En Er Mundo या गाण्याच्या सुरूवातीला वाजते. याला म्युझिकल गिटारिस्ट Pepe El Trompetaने रिकंपोज केले. यानंतर विविध म्युझिशियन्सनी आपापल्या गाण्यांमध्ये याचा वापर केला. यात तुरही नावाच्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज आहे.

आयपीएल ट्यूनला फ्रेंच डीजे प्रोड्युसर जॉन रेवॉक्सच्या म्युझिकचा एक भाग मानला जातो. जर तुम्हाला ही स्पॅनिश ट्यून ऐकायची असेल तर तुम्हाला यूट्यूबवर Pepe El Trompeta En Er Mundo सर्च करावे लागेल. यानंतर हे गाणे सर्च स्क्रीनवर येईल. हे गाणे साडे पाच मिनिटांचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -