Tuesday, June 25, 2024
Homeताज्या घडामोडीSalman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

Salman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारामुळे (Firing) खळबळ उडाली होती. बिश्नोई गँगने (Bishnoi gang) या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. यानंतर आता बिश्नोई गँगने सलमान खानला थेट जीवे मारण्याची धमकी (Death threat) दिली आहे. या प्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर पोस्ट केला होता. यामध्ये सलमानला जीवे मारण्यासंदर्भात धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी त्यासंदर्भात ५०६ (२) भादवी कलमांसह ६६ (ड) आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानला एक पथक तपासासाठी पाठवले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात बनवारीलाल गुज्जर याला राजस्थानमधून अटक केली आहे. गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कसा झाला होता गोळीबार?

१४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या ७२६६ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

बिश्नोई समाजाचा सलमान खानवर राग का?

१९९८ साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -