Tuesday, June 25, 2024
Homeताज्या घडामोडीलेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा...

लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

नवी मुंबई(प्रतिनिधी)- लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांनी संशोधनात्मक लिहलेले ” आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर ” हे पुस्तक ८ जून २०२४ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. रंगधनु प्रकाशित या पुस्तकात ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा शोध घेऊन त्यांचा उहापोह केलेला आहे.

८ जून हा लेखक,कवी गज आनन म्हात्रे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त ‘ रंगधनु प्रकाशन संस्था ‘ आणि ‘ नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवीमुंबई ‘ यांनी संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ” रंगधनु नवरंग साहित्य संमेलन ” आयोजित केले आहे.

नेरुळ सेक्टर ४४ ए च्या ‘ठाकूर हाॅल ‘मधे हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून ग्रंथदिंडी , संमेलनाचे उद्घाटन , पुस्तक प्रकाशन, मान्यवरांची भाषणे , समाज आणि साहित्य संमेलन या विषयावर परिसंवाद, कवीसंमेलन होणार आहे. या संमेलनात साहित्यिक प्रमोद कर्नाड, अनुपमा उजगरे , एल.बी. पाटील, कौमुदी गोडबोले, आप्पा ठाकूर , श्याम जोगळेकर , रवी वाडकर, अनिल पराडकर, सुदेश जगताप , खंडू अडांगळे है उपस्थित राहणार आहेत. नवीमुंबईतील साहित्य प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ‘ नवरंग साहित्य सं

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -